डाळ कांदा (नागपुरी स्टाईल) | Daal Kaanda (Nagpuri Style)

डाळ कांदा - नागपुरी स्टाईल
डाळ कांदा - नागपुरी स्टाईल 
जवळ जवळ २ महिने मी acid reflux ने डाउन असल्याने घरातलं सगळं ताळमेळ हल्ल होतं अँड आमचे खवैये 'सुचकराव' खूप दिवसांपासून बायकोच्या हाथचं चमचमीत व झणझणीत जेवण मिस करत होते. तो स्वतः एक उत्तम chef आहे पण २ महिने work from home and daily chores मुळे त्याच्यावर एकदम ताण आला होता. म्हणून मी आधीच ठरवलेले बरं वाटल्या वाटल्या पहिले मी सुचकसाठी काहीतरी झणझणीत बनवेन. घरी चना डाळ आणी पातीचा कांदा हि होता. झणझणीत व त्यात शाकाहारी, दोन्ही गोष्टी नागपुरी स्टाईल "डाळ कांदा" ने साध्य झाल्या. 

वरील फोटो अजून चांगल्या पद्धतीने काढता आला असता. So on a seperate note, एक गोष्ट अजून मी करणार आहे ते म्हणजे "Learn  Photography" apart from blogging. 


साहित्य:

१. चना डाळ - १ वाटी (अर्ध्या तास पाण्यात भिजवून ठेवा) 
२. पातीचा कांदा - पाव गड्डी (पात व त्याचा कांदा बारीक चिरून घ्या) 
३. कांदा - १ वाटी 
४. आलं, लसूण - ४ टेबलस्पून भरडलेली पेस्ट (मला मिक्सर पेक्षा खलबत्यातली पेस्ट आवडते) 
५. लाल तिखट - १.५ टेबलस्पून  (तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता) 
६. हळद - १ टीस्पून  
७. गरम मसाला पावडर - १/४ टेबलस्पून 
८. फोडणी साठी - १/४ टेबलस्पून राई व  १/४ टेबलस्पून जिरं व चिमूटभर हिंग 
९. चवीनुसार मीठ
१०. खुपसारी बारीक चिरलेली कोथिंबीर 

कृती:

१. एका कढईत अर्धा वाटी तेल घ्या. तेल गरम झालं की राई टाका, राई तडतडली की जिरं व हिंग टाका, मग कांदा व पातीचा कांदा घाला. 

(नागपुरी जेवण म्हटलं की तेल व तिखट टाकायला हात थोडा सढळ हवा. आपल्याला नको असल्यास आपल्या गरजेनुसार घ्यावे. पहिल्यांदा मी जेव्हा सुचकच्या गावी गेलेली तेव्हा मी बघितलं विदर्भात प्रत्येक घासाला मीठ व तिखट चटणी सारखं खाल्लं जातं.)
 
२. आता कांदा व पातीचा कांदा टाकून छान परतवावा आणी मंद आचेवर शिजवावा.

३. कांदा पारदर्शक झाला की त्यात आलं लसणाची पेस्ट घाला व परत छान परतून घ्या. ५-६ मिनटं शिजवा.  

४. आता त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला व चवीनुसार मीठ टाकून २-३ मिनटे परतवा. 

५. नंतर भिजवलेली चणा डाळ टाकून ५-६ मिनिटे परतवावी. 

६. आता त्यात जवळ जवळ ३ ग्लास गरम पाणी टाकून भाजी मंद आचेवर शिजू द्यावी. सुचकला ह्या भाजीत जास्त रस्सा नाही आवडत म्हणून मी वर फोटो प्रमाणे थोडा रस्सा राही पर्यंत शिजवते. 

(तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी आठवू शकता, ही चणा डाळ आहे ति शिजायला वेळ घेते म्हणून मी ३ ग्लास पाणी घातले. मला २० मिनिटे लागली, वर फोटो मधील कन्सिस्टेनसिटी यायला)

७. गॅस बंद करून त्यात हिरवीगार बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने गार्निशिंग करा अँड गरम गरम चपाती, भाकरी किव्हा भाता सोबत एन्जोय करा आणी आमची आठवण नक्की काढा. 

सुचकरावांनी तर डाळ कांद्याच्या मेजवानी वर ताव मारला, आता तुम्ही ही रेसिपी करून बघा व तुम्हाला कशी वाटली हे खालील कंमेंट बॉक्स मध्ये जरुर कळवा. 

Comments

  1. Thank you for the recipe. मस्तच बनला डाळ कांदा 😋

    ReplyDelete
    Replies
    1. Minal, मला आनंद आहे की आपण रेसिपीचा आनंद घेतला. Subscribe to my channel to receive automated update on the upcoming post.

      Delete

Post a Comment

Popular Posts