चीऊ ची भाजी


चिवई  ची भाजी 

  तुम्ही म्हणाल पहिली पोस्ट ती पण चीऊ ची भाजी। 

  ते अस आहे तर मी एक मालवणी मुलगी मैरिड टू अ विदर्भीयन। पहिल्यांदा या भाजीचे नाव मी सासरी ऐकले। दुसरे म्हणजे तुम्ही आमच्या बायो मधे वाचल्या प्रमाणे आमचे हे खवइयै एंड त्यांची ही एक आवडती भाजी।  प्लस आता उन्हाळा चालु झालाय। म्हणून म्हटल आपली पहिली पोस्ट एकदम हटके भाजी च्या रेसिपी ने सुरु करू! नक्की करून बघा ! ही भाजी मला सुचक ची मुंबई ची मावशी किव्हा आमच्या अमरावती च्या खेपेत मिळते। पुण्यात गेल्या तीन वर्षात तरी नाही मिळाली। 

चिवई / चिवली / चिऊ  नावा प्रमाणे ही भाजी पण अतिशय नाजुक असते। चीवई ही एक पौष्टिक वनस्पति आहे. विदर्भा मधे ही पाले भाजी म्हणून उन्हाळ्यात घरा घरा मध्ये बनवली जाते। 

चिवई चा गुणधर्म थंड असल्याने डॉक्टर "यूरिनरी ट्रैक्ट डिसऑर्डर" चा त्रास असल्यास चिवईच्या पानांचा रस पिण्याचा सल्ला देतात, एवढेच नव्हे ही भाजी लोह युक्त पण आहे. त्यामुळे उन्हाळ्यात अवश्य करा. 



साहित्य: 

  • चिवई - २ जुडी 
  • बेसन - १.५ वाटी 
  • कांदा - ३ मोठे 
  • कैरी - १/२ चिरलेली (कैरी नसल्यास मी ४-५ दाणे लिंबूफूल टाकते )
  • मीठ - चवी नुसार 

फोडणीसाठी: 

  • तेल  - १ वाटी 
  • राई - १ टीस्पून 
  • हिंग - १/४ टीस्पून 
  • हळद - १/२ टीस्पून 
  • लाल तिखट - चवी नुसार 

कृती: 
  1. भाजी स्वच्छ धुवून घ्या आणि चाळणी वर बाजूला ठेवा. 
  2. भाजी चिरा आणि चिरलेली कैरी मिसळा. 
  3. एका कढईत तेल गरम झाले की राई टाका, राई तडतडली की हिंग टाका मग कांदा घाला. 
  4. कांदा लालसर झाला की हळद घालणे (जर लिंबूफूल वापरत असाल तर ते आता घालणे)
  5. लाल तिखट व मीठ चवीनुसार घालणे. आम्ही घरी तिखट खात असल्याने मी ३ टीस्पून लाल तिखट घातले. २ मिनीट चांगलं परतवा. 
  6. आता बाजूला ठेवलेली चिरलेली भाजी टाका व मंद आचेवर परतून घ्या. 
  7. साधारण दहा मिनिटानंतर भाजीचा रंग बदलल्यावर बेसन घालून चांगलं ढवळून झाकण ठेवा ते चांगले दहा मिनिटासाठी शिजवा.     
  8. Tadaa! तुमची भाजी तयार.  


गरम गरम भाता बरोबर किंवा चपाती किंवा भाकरी बरोबर खा आणी खाताना आमची आठवण काढा.

Comments

  1. 😍 मज्जा आली वाचून

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, आपल्याला ही भाजी मिळाल्यास नक्की करून पहा!

      Delete
  2. पुण्यात देखील मिळते. पिंपरी चिंचवड मध्ये हमखास मिळते ही भाजी

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts