Saoji Chicken Recipe
Bawaji Ki Jai Ho, Jai Ho Bawaji!!!
Yeh hai hamare #Bawaji!!!
Let me take you to the #Bawaji
Sukh ganjan #bawaji,
dukh hanjan #bawaji
Aye aye Wonderful #bawaji powerful #babji
Spicy-ful Bawaji
नक्की हा बावाजी कोण. तुम्ही म्हणाल मॅडम भसकल्या वाटतं, आज एकदम trippy mood दिसतोय. सावजी चिकन रेसिपी सोडून एकदम बावाजी वर गाणं.
असं झालं, लग्नाच्या पहिल्या वर्षी आम्ही सुचकच्या काकांकडे अकोलाल्या गेलो. काका व काकू आम्हाला फिरायला विदर्भातल्या हिल स्टेशन म्हणजे चिखलदऱ्याला घेऊन गेले. संदर्भा बाहेर आहे पण नोंद घ्यावी, काकूंना 'काकू' म्हणणं थोडं ऑड वाटायचं कारण माहेरी किव्हा मुंबईला मला 'काकी' म्हणायची सवय होती अँड ह्या आधी 'काकू' म्हणून कधीच कोणाला संबोधलं नाही. आता सवय झाली. चिखलदरा बद्दल एक वेगळा ब्लॉग लिहता येईल, पण थोडासा उल्लेख करते, काकूंनी मला सांगितले हे एक नुसतच हिलस्टेशन नसून - महाभारतात भीमाने किचक नावाच्या राक्षसाला इथेच चडाओडिथ ठार करून दरीत फेकलं होतं. आणी काकांनी सांगितल्या प्रमाणे महाराष्ट्रातले हे एकमेव कॉफी उगवण्याचे क्षेत्र आहे.
वाटेत काकांनी आम्हाला एका बावाजी च्या धाब्यावर सावजी जेवण जेवायला नेले. तर हे ते बावाजी, जेवण इतकं भारी होतं की बावाजी की बुटी खाऊन जसं movie "Go GOA GONE" मध्ये कुनाल खेमु अँड इतर high जहालें तसे आम्ही एकदम सावजी चिकन खाऊन पार ढगात. आता कळलं असेलच वरच्या गाण्याचा संदर्भ. त्या बाबाजींना खूप विनंती करून त्यांनी रेसिपी दाखवली. असा माझा परिचय झाला 'सावजी' जेवण व 'बावाजी' ह्या शब्दाशी. विदर्भामध्ये म्हाताऱ्या माणसाला बावाजी म्हणतात.
आज मी ती रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते नक्की करून बघा अँड खाऊन एक्दम high व्हा!
साहित्य:
- चिकन - १ किलो
- हळद - १ टीस्पून
- कांदे चिरलेले - ३ मोठे
- आलं - १ मोठा तुकडा
- लसूण - १ कांदा
- कोथिंबीर - अर्धा जुडी
सावजी मसाल्याचे साहित्य:
- धणे - १ वाटी
- लाल सुक्या मिरच्या (मी विदर्भ स्पेशल - भिवपुरी वापरते) - १०-१२
- दालचिनी - २ इंच
- तमालपत्र - ४-५
- लवंग - १०-१२
- काळीमिरी - २०
- हिरवी वेलची - ६
- ज्वारीचा पीठ - ४ टेबलस्पून
फोडणीसाठी साहित्य:
- तेल - १ वाटी
- लाल तिखट (भिवपुरी) - २ टेबलस्पून
- मीठ - चवीनुसार
तुम्हाला भिवपुरी नाही मिळाली तर तुमच्याकडे जी असेल ती मिरची वापरू शकता.
कृती:
- सर्वात आधी चिकन स्वच्छ धुवून घ्या. त्याला हळद, मीठ व तेल लावून मॅरीनेट करायला ठेवा.
- आता सावजी मसाला बनवण्यासाठी, लाल सुख्या मिरच्या, धने. जिरे, लवंग, काळीमिरी, तमालपत्र, दालचिनी, हिरवी वेलची, हे वेगळे वेगळे मंद आचेवर खरपूस भाजून घ्या. मग सर्व एकत्र करून त्यात ज्वारीचं पीठ घालून एक ते दोन मिनिटे एकत्र भाजून घ्या.
- आता कांदे लांब पातळ कापून, तेलात लालसर भाजून घ्या. आलं व लसूण पण भाजून घ्या.
- सर्व भाजलेले मसाले, कांदा आलं लसूण एकत्र पाणी घालून बारीक मिक्सर मध्ये वाटून घ्या. वाटलेला मसाला गाळून घ्या. सावजी मसाला तयार आहे.
- एका कढईत एक वाटी तेल तापवून घ्या त्यात तयार सावजी मसाला घालून ७-८ मिनटे परतवून घ्या.
- मॅरीनेट केलेले चिकन त्यात घालून एकत्र करून घ्या.
- मग लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून एकत्र करून झाकण ठेवून १०-१५ मिनटं शिजवून घ्या. मिश्रण आता बाजूने तेल सोडायला ला लागेल.
- रस्सा तुमच्या आवडीनुसार पातळ किव्हा घट्ट करू शकता.
- बारीक चिरलेली कोथिंबीर ने गार्निशिंग करा व गरमा गरम सावजी चिकन तयार आहे.
- चपाती, फुलका, भाकरी, भाता सोबत सावजी चिकन वर ताव मारा. आम्ही घरी सावजी चिकन सोबत लहसूनी भाता करतो.
सावजी जेवणा सोबत थंडगार ताक, लिंबू आणि कांदा हा विदर्भातला आवडता बेत.
आम्हाला दोघांना मटण आवडत नाही म्हणून मी चिकन करते तुम्ही वरील रेसिपी मटण वापरून करू शकता. मटण थोडं उशिरा शिजतं तर आधी मॅरिनेटेड मटण कुकर मध्ये ५-६ शिट्या करून शिजवून किव्हा पद्धतीने केले तर ३० मिनिटं शिजवून घेणे.
मला खात्री आहे तुम्ही पण सावजी खाऊन नक्की high व्हाल, तुम्हाला कसा अनुभव आला ते नक्की खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
Farach sundar. Very good
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete