Vanga Batata Rassa Bhaji Vidarbha Style































वांगं बटाटा रस्सा भाजी विदर्भ पद्धतीची 

#vangabatata #aalobaingan #rassa #bhaji



वांगं म्हटलं की सहसा लोकांचं तोंड वाकडं होतं. पण माझं लहानपणा पासुन भरलेलं वांगी कायम आवडीचं, मी भाज्यांमध्ये सर्व प्रथम भरलेली वांगी बनवायला शिकले म्हणून असेल कदाचित.आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी ही भाजी माज्या शेजारी राहणाऱ्या दादा कडून पाचवीत असताना शिकले. वांग्याचा अजून एक किस्सा मला आठवतो तो म्हणजे माझं व माझ्या आजीचं संभाषण ते पण इतकं मनात घर करून आहे की दर वर्षी गणपतीत आठवतं. गणपती आता जवळच आले आहेत आणी म्हणूनचं ती आठवण पुन्हा एकदा आली. 

मी नुकतीच भरलेली वांगी करायला शिकलेली आणी म्हणूनच मी खूप उत्साही होते. ते संभाषण असं होतं:

मी - आजी आपण उद्या गणपती बापाच्या नैवेद्याला वांग्याची भाजी करायची का?

आजी (माहीत नाही का पण थोडं तोंड वाकडं करत म्हणाली)  - नाही नाही वांगी मुळीच नाही. 

मी - का गं?

आजी -  उद्याच्या भाज्या आधीच ठरल्या आहेत. आणी नैवेद्यात वांगी वर्ज्य आहेत. 

मी - अगं, ते मला कळलं पण का नाही करायचं ते तू नाही सांगितलंस. 

आजी (कंटाळून) - अगं वांग्याला देवाचा शाप आहे आणी म्हणूनचं आपण नाही करत. 

मी - अगं पण का?

आजी - तुझे प्रश्न आपण नंतर सोडवू आरतीची तयारी करायची आहे आणी तुला आरती झाली की मोदक नाही खायचा का?

बस मोदकाच नुसतं नाव काढताच मी वांगी बिंगी सर्व विसरले. माझी आजी कोकणातली होती, नीट नेटके पणा, वेगवेगळ्या रेसिपी लिहून ठेवणं तिला खुप आवडायचं. आमच्या मामा कडे गणपती आता ४० वर्षा पासून येतो. आणी मला नाही आठवत इतक्या वर्षात आम्ही कधी वांग्याची भाजी नैवेद्याला केली असेल. आजी जरा तुच्छतेने वांग्याकडे बघायची. आणी तेच वाल, आमसुलं, काजू, काळा वाटाणा, केळफूल, फणस यांच्या विषयी बोलताना अगदी साजूक वृत्ती!

आता ती तर नाही त्यामुळे जर तुम्हाला वांग्याच्या शापा बद्द्ल माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण त्या वेळीस मोदकाने बाजी मारली आणी माझ्या कोमल मनावर ठसवून गेली की नैवेद्याला वांगी मुळीच नाही.  

मोठं झाल्यावर शोधलं तर कळलं की वांगी न खाण्यामागे विविध कारणे आहेत. आजी कदाचित कामाच्या रगाड्यात तेव्हा मला टाळण्यासाठी शापा बद्दल बोलली असेल. वांग्यांमद्ये खूप प्रमाणात हिस्टामाइन्स व काही प्रकारांमध्ये तर एलर्जनही आहेत. त्यामुळे वैद्यग्रंथांमध्ये वांगी कधी खावीत व कधी खाऊ नयेत हे सांगितलं आहे, गर्भवती स्त्रियांना वांगी वर्ज्य आहेत. शिवाय वांग्याचं रूप मांसाहारी पदार्थाजवळ जाणारं असतं यामुळे काही घरांमध्ये नैवेद्याला नसावं. ज्या दादा ने मला भरलेली वांगी शिकवली तो स्वतः ब्राह्मण आहे व तो चार्तुमासात वांगी खात नाही व त्याचं म्हणणं असं आहे की वांगी वातूळ आहेत आणी दुसरं म्हणजे त्यात अळी असतात.

काही दिवसापूर्वी मी ऑनलाईन वाचलं की वांग्याचा अवशेष हडप्पा संस्कृतीत (२६०० इ. स. पू.) सुद्धा दिसून येतो. तर नक्कीच शाप नसावा.  

आता लग्न झाल्या नंतर आमचं वांग्या शिवाय जमतच नाही. लग्नाची पंगत असो, महालक्ष्मीचे किव्हा घरी नैवेद्याचं पान असो वांगी शिवाय चालत नाही. लग्नं झालं आणी आम्ही पण घरी गणपती बाप्पा ठेवायला लागलो, दीड दिवसांसाठी.  मग काय आजीची शिकवण असो किंवा सासरचा मान, एक दिवस नैवद्य कोकणपद्धदिताचा व एक दिवस विदर्भपद्धतीचा. आणी अश्या प्रकारे मी  विदर्भातील प्रसिद्ध असलेली वांगं बटाटा रस्सा भाजी करायला शिकले दहा वर्षांपूर्वी. तीच तुमच्या सोबत खाली शेअर करते आहे.  
    
    तुम्ही बनवून बघा आणी ह्या वर्षी गणपतीच्या नैवेद्याला होऊन जाऊदे विदर्भ स्पेशल वांगी बटाटा रस्सा भाजी! 

    आणी हो भरलेल्या वांग्याची रेसिपी कधीतरी नंतर नक्की शेअर करेन. 

Ingredients:
  • For tempering
    • Oil - 2 tablespoon or more based on your liking
    • Mustard Seeds - 1 teaspoon
    • Cummin Seeds - 1 teaspoon
    • Turmeric Powder - 1 teaspoon
    • Chilli Powder - 2 teaspoon
    • Asafoetida - a pinch of it
    • Sesame Seeds (Optional) - 1 teaspoon
    • Kaala Masala (Optional) - 1 teaspoon
  • Brinjal - 3-4 medium size
  • Potato - 1 medium size
  • Tomato - 1 medium size
  • Ginger - 1 inch coarse paste
  • Garlic - coarse paste
  • Jaggery - 1 teaspoon
  • Coriander - handful 
  • Salt as per taste


PS - Just to give a little twist, I cut veggies long, usually I dice them. Also I avoid onion for this vegetable, you can add if you like.

Tip - To get the nice red color (तर्री as we call it in Marathi) to the veggies, always add little chilli powder in the hot oil before adding the tomato. 

Procedure
  1. Take a pan and heat oil on medium flame. Add mustard and let it splutter, then add cummin and sesame seeds to it.
  2. Now add asafoetida and pinch of red chilli powder to get nice red tarri.
  3. Add Ginger-Garlic paste and cook it till it leaves the raw smell.
  4. Now add Tomatoes to it and cook it till it starts leaving oil from sides.
  5. Add red chilli powder, turmeric, salt, jaggery and kaala masala, mix well.
  6. Now add potato and brinjal vegetables to it, mix well and cover the pan with a plate and fill the plate with water. Make sure the water don't get into the pan. This way you can make good moisture environment for the food and it will not burn. I do it this way as Suchak doesn't like too much gravy in it. You can add around a glass of water or more based on consistency you prefer.
  7. Keep stirring the veggies in between to avoid burning. Our Vanga Batata Rassa Bhaji should be ready in 20 minutes or so. Turn off the flames and garnish it chopped coriander.
  8. Serve it with hot chapati, bhakri or rice.

Comments

  1. Looks delicious. Will definitely try

    ReplyDelete
  2. प्रस्तावना खूपच छान आहे आणि रेसिपी सुद्धा एकदम मस्त आहे उद्याच करून बघेन आजी सारखीच तुला सुद्धा रेसिपी लिहून ठेवायची सवय आहे बघून खूप बरं वाटलं.

    ReplyDelete
  3. nicely wrote. recipe is also good.
    i made it without garlic its taste nice. As you know we don't eat onion garlic. and one more thing when you make bhoga (nevyada) for lord we shouldn't use onio garlic because its come in mood of ignorance. whatever reasons you gave for not using bringal in bhoga is right bringal also comes under mood of ignorance.
    We should offer food to lord which are in mood of goodness which means the food are easy to digest.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for trying the recipe and also sharing another insight to why Brinjal should avoided in Naivedya.

      Delete

Post a Comment

Popular Posts